कारागृह महानिरीक्षक यांनी घेतली आढावा बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारागृह महानिरीक्षक यांनी घेतली आढावा बैठक
कारागृह महानिरीक्षक यांनी घेतली आढावा बैठक

कारागृह महानिरीक्षक यांनी घेतली आढावा बैठक

sakal_logo
By

ठाणे, ता. २१ (वार्ताहर) : राज्यातील सर्व कारागृहांचे अधीक्षक आणि कारागृह उपमहानिरीक्षक, सर्व मध्यवर्ती कारागृहांचे अधीक्षक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची उपस्थिती होती. बैठकीत कारागृह अधीक्षक आणि मध्यवर्ती कारागृह अधीक्षक यांच्याकडून कारागृहात असलेल्या उणिव आणि जाणिवा सहकैद्यांच्या मागण्यांवर विचारविमर्ष करण्यात आला. ही बैठक मंगळवारी (१७ जानेवारी) रोजी पार पडली. यात कैद्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर विचार करण्यात आला. कारागृह म्हणजे नरकगृह अशी संकल्पना असलेले कारागृह हे सुधारगृह करण्याच्या कल्पनेवर या बैठकीत भर देण्यात आला. कारागृह भेटीवेळी अनेक बंद्यांनी सध्या कडाक्याची थंडी सुरू असल्याने आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध होण्याबाबत विनंती केली होती, त्याप्रमाणे सर्व कारागृह अधीक्षकांनी बंद्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे तसेच थंडीपासून बचावासाठी चादर व उशी उपलब्ध होण्याबाबतच्या कैद्यांच्या मागणीकडे लक्ष वेधले. मुलाखतीच्या खिडक्यांमध्ये वाढ, कॉईन बॉक्स सुविधेचा वापर करण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. त्यासाठी सर्व बंद्यांना सर्व सुविधा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी कॉईन बॉक्सची संख्या वाढवून कारागृह सुधारगृह करण्यासाठी उपाययोजना करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.