मेजर डॉ. दीपक शेलार यांना सहोदरी सन्मान पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेजर डॉ. दीपक शेलार यांना सहोदरी सन्मान पुरस्कार प्रदान
मेजर डॉ. दीपक शेलार यांना सहोदरी सन्मान पुरस्कार प्रदान

मेजर डॉ. दीपक शेलार यांना सहोदरी सन्मान पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

डहाणू, ता. २२ (बातमीदार) : चिंचणी पी. एल. श्रॉफ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य मेजर डॉ. दीपक शेलार यांनी हिंदी भाषा दिनाच्या निमित्ताने मॉरिशस येथील आंतरराष्ट्रीय अधिवेशनात प्रवासी साहित्य या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन केले. त्यानिमित्त हिंदी भाषा सहोदरी संस्थेकडून सहोदरी उपाधी प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जावी, हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी हिंदी भाषा सहोदरी ही संस्था सतत प्रयत्न करत आहे. ९ जानेवारी रोजी जागतिक हिंदी भाषा दिनानिमित्ताने संस्थेचे नववे आंतरराष्ट्रीय अधिवेशन मॉरिशस येथील महात्मा गांधी संस्थान येथे पार पडले. या अधिवेशनासाठी देश विदेशातील २०० प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनाचे उद्घाटन मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंह रूपन यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी आपल्या भाषणातून भारत मॉरिशस मैत्रीपूर्ण संबंधाचा उल्लेख केल, तर भाषा सहोदरी संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयकांत मिश्रा यांनी हिंदी भाषा ही जगामध्ये बोलली जाणारी दुसरी भाषा असल्याचे सांगून, भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी असावी, यावर त्यांनी भर दिला. या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेल्या सदिच्छा पत्राचे वाचन करण्यात आले.