जुन्या बटाट्याला बाजारात ‘भाव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या बटाट्याला बाजारात ‘भाव’
जुन्या बटाट्याला बाजारात ‘भाव’

जुन्या बटाट्याला बाजारात ‘भाव’

sakal_logo
By

वाशी, ता. २२ (बातमीदार) ः काही महिन्यांपासून कांद्यापाठोपाठ बटाट्याचे दरदेखील चढे आहेत. अशातच सध्या बाजारात नवीन बटाट्याची आवक वाढली असल्याने जुन्या बटाट्याचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे; परंतु असे असतानाही बाजारात मात्र नवीन बटाट्यापेक्षा जुन्या बटाट्याचे दरच अधिक भाव खात आहेत.
पाऊस लांबल्याने यंदा नवीन बटाटा बाजारात दाखल होण्यास विलंब झाला आहे. त्याचा परिणाम बाजारात सध्या जुन्या बटाट्याला अधिक मागणी आहे. त्यामुळेच एपीएमसीत नवीन बटाटा प्रतिकिलो ८ ते १२ रुपये; तर जुना बटाटा १८ ते २१ रुपयांनी विक्री होत आहे. सध्या एपीएमसी बाजारात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात बटाटा येत आहे; तर बाजारात नवीन बटाटादेखील मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. एपीएमसीत शनिवारी ५४ गाड्या आवक झाली असून १० गाड्या जुना बटाटा तर उर्वरित गाड्या नवीन बटाटा दाखल झाली आहे. त्यामुळे नवीन बटाटा ही जुन्या बटाट्याच्या बरोबरीने विक्री होत असून आवक वाढल्याने नवीन बटाट्याचे दर उतरले असून प्रतिकिलो १२ रुपयेपर्यंत उपलब्ध होत आहे.
-------------------------------------------
बाजारात जुन्या बटाट्याचा हंगाम येत्या १० ते १५ दिवसात संपणार असल्याने सध्या बाजारात जुन्या बटाट्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे जुन्या बटाट्याचे दर अधिक आहेत. जुना बटाटा हंगाम संपताच नवीन बटाटा साठवणुकीलाही सुरुवात होणार असून त्यामुळे नवीन बटाट्याची आवक कमी होऊन दर पुन्हा वधारतील.
- मनोहर तोतलानी, व्यापारी