पोलादपूरमध्ये सहा महिन्यात १३ अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलादपूरमध्ये सहा महिन्यात १३ अपघात
पोलादपूरमध्ये सहा महिन्यात १३ अपघात

पोलादपूरमध्ये सहा महिन्यात १३ अपघात

sakal_logo
By

पोलादपूर, ता. २२ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गवर सातत्‍याने अपघात होत असून पोलादपूरपासून सुरू होणाऱ्या कशेडी घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. येथील धामणदेवी ते पोलादपूर या ६ किलोमीटर अंतरात सहा महिन्यांत झालेल्या १३ अपघातात ७ जण ५ गंभीर जखमी तर ९ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली.
महामार्गाचे काम १३ वर्षांपासून रखडले आहे. त्यातच कशेडी घाट परिसरातील चढ उतारावरील वळणे व दरडीचे सातत्य लक्षात घेता, महामार्ग विभागाने या मार्गाला पर्याय म्हणून कशेडी भोगदा करण्यात येत आहे. मात्र मुख्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सध्या काम करण्यात येत आहे.
पोलादपूर ते धामनदिवी दरम्‍यान चोळईजवळ सातत्याने अपघात होत आहेत. जुलै २०२२ मध्ये याठिकाणी दोन अपघात झाले असून २ किरकोळ जखमी झाले होते. ऑगस्ट महिन्यात तीन अपघातांत ३ जणांचा मृत्‍यू तर २ गंभीर व २ किरकोळ जखमी झाले होते. सप्टेंबरमध्ये ३ अपघात ३ गंभीर व ३ किरकोळ जखमी झाले होते. ऑक्टोबर महिन्यात एका अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला होता. नोव्हेंबर महिन्यात ३ अपघातामध्ये ४ मृत्यू झाले व १ गंभीर जखमी झाला होता तर डिसेंबरमध्ये झालेल्‍या एक अपघातात एक जखमी झाल्‍याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
महामार्ग विभागाकडून उपाययोजना आवश्‍यक
- तीव्र वळण कमी करणे गरजेचे आहे.
- चढ-उतारासह दरडग्रस्त भागात डोंगरावर जाळीसह संरक्षक भिंतीची उंची वाढविणे
- वाहनचालकासह प्रवाशांना वेगासह इतर घटकांबाबत जनजागृती करणे
- नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर कठोर/दंडात्‍मक कारवाई करणे

.....................

महामार्गासाठी माणगावमध्ये जनआक्रोश
माणगाव, ता. २३ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील रेपोली येथे १९ जानेवारीला पहाटे अपघात होऊन १० जणांना जीव गमवावा लागला होता. त्‍यानंतरही महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्‍या व्यक्‍तींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे रेपोली येथे अपघात झालेल्या ठिकाणी शेकडो नागरिक एकत्र आले होते.
रेपोली-माणगाव बसस्थानक ते बाजारपेठेतून मूक मोर्चा काढून वाहन सुरक्षित चालवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. मोर्चास माणगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. रेपोली येथे जनआक्रोश समितीतर्फे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि गोरेगाव पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.

माणगाव : महामार्गावर शेकडो नागरिकांनी एकत्र येत पोलिसांना निवेदन दिले.