कर्जत चित्रकला स्‍पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत चित्रकला स्‍पर्धा
कर्जत चित्रकला स्‍पर्धा

कर्जत चित्रकला स्‍पर्धा

sakal_logo
By

रंगात रंगले सारे...

कर्जतमध्ये बच्चे कंपनीचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
कर्जत, ता. २२ (बातमीदार)ः कर्जत शहरातील अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशन ट्रस्टच्या शारदा इंग्लिश मीडियम शाळेत ‘सकाळ’ तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. हुडहुडी भरणारी थंडी असूनही विद्यार्थ्यांनी उत्‍साह वाखाणण्याजोगा होता. कोणी रंगीत खडू तर कोणी वॉटर कलरचा वापर करून चित्र साकारत होते.
प्रतीक अशोक पालवे या विद्यार्थ्यांने कोरोना योद्धा या विषयावर सुंदर चित्र काढले. तर विशाखा जगताप या पालक महिलेने सुद्धा विज्ञान या विषयावर छानसे चित्र काढले. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे तसेच शिक्षिका अस्मिता ठाणगे, चेतना महांगडे, श्रुतिका पवार, सोनाली गवळे, रशिदा कर्जतवाला यांनी पर्यवेक्षिका म्हणून काम पाहिले.
कर्जत ः प्रतीक पालवे याने कोरोना योद्धा या विषयावर चित्र रेखाटले.

..............

माणगावमधील केंद्रावर जोशपूर्ण वातावरण

माणगाव, ता. २२ (बातमीदार) ः शहरातील अशोक दादा साबळे विद्यालय केंद्रात प्रचंड उत्साह आणि जोशपूर्ण वातावरणात सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित चित्रकला स्‍पर्धा पार पडली. गेल्‍या काही दिवसांपासून उत्‍सुकता लागलेल्‍या या स्पर्धेत माणगाव शहर व तालुक्यातील विविध माध्यमांच्या विद्यार्थ्यांसह नागरिक, ज्‍येष्‍ठांनी सहभाग नोंदवला.
अत्‍यंत एकाग्रतेने रंग, रेषा व कल्पकतेने स्पर्धकांनी चित्रे रेखाटली. सकाळपासूनच तालुक्‍यातील विविध गावातील पालक-विद्यार्थ्यांनी स्‍पर्धा केंद्रावर गर्दी केली होती. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्‍साह शिगेला होता.
सकाळ वृत्तपत्राची ही चित्रकला स्पर्धा म्‍हणजे विद्यार्थी व पालकांसाठी पर्वणी असून कलेचे वेगळे व्यासपीठ मिळत असल्याची भावना या वेळी अनेक पालकांनी बोलून दाखविली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांचे विशेष सहकार्य मिळाले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य डी. एम.जाधव, अरुण पवार, कलाशिक्षक आर. टी. पवार, संजय आरसे, भरत काळे, राजेंद्र भगत, सचिन वनारसे, अनंत सावंत यांनी सहकार्य केले.
अत्‍यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्‍या स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागून आहे. दरवर्षी अशा स्पर्धा व्हाव्यात, अशी विनंती करून अनेक पालकांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.

सकाळ चित्रकला स्पर्धेची आम्ही वाट पाहतो, अत्‍यंत वेगळे विषय व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही स्पर्धा आहे. अशा पद्धतीचे शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार.
- मनीष पाटील, पालक

सकाळ समूहाची चित्रकला स्पर्धा आमच्या विद्यालयात आयोजित होणे अतिशय आनंदाची बाब आहे. या उपक्रमात आम्हीही सहभागी झालो, याचा आनंद आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्‍साहात, सुंदर चित्र रेखाटली आहेत.
- डी.एम. जाधव, मुख्याध्यापक, अशोक दादा साबळे विद्यालय, माणगाव.

स्पर्धेतील चित्र काढायला मला आवडले, सर्वच विषयांवर मला चित्र काढायची होती. मी घरी ती काढेल. मला स्पर्धेत सहभागी होऊन खूप आनंद मिळाला.
- सृष्टी राजेंद्र भगत, विद्यार्थिनी, माणगाव

माणगाव ः केंद्रातील विद्यार्थ्यांमध्ये उत्‍साह दिसून आला.

---------------------

रसायनीतील चार गटांत स्‍पर्धा
रसायनी, ता. २२ (बातमीदार) : वासांबे-मोहोपाडा येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचालित पिल्लई एचओसीएल महाविद्यालयात सकाळ वृत्तपत्राच्या वतीने चार वेगवेगळ्या गटातील चित्रकला स्‍पर्धा घेण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पिल्लई एचओसीएलचे अमित राजे, संजय कन्हरे, प्रिया स्कूलचे दिपाली शिर्के, विपषाना भालेराव, सांची भालेराव, आर्या पाटील, आदर्श जाधव, प्रिन्स मंडल यांनी सहकार्य केले. तसेच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिमा निकाळजे, आर. बी. पाटील यांनी स्पर्धासाठी विशेष सहकार्य केले.

रसायनी -