डहाणूत कलागुणांना प्रोत्साहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत कलागुणांना प्रोत्साहन
डहाणूत कलागुणांना प्रोत्साहन

डहाणूत कलागुणांना प्रोत्साहन

sakal_logo
By

डहाणू, ता. २२ (बातमीदार) : डहाणूतील के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबरच ज्येष्ठांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२३’ला या केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये रविवारी पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसह कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी के. एल. पोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक रवींद्र भागे, मडवे सर, अ. ज. म्हात्रे हायस्कूलच्या जोगळेकर मॅडम यांच्यासह इतर शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.