दांडीत चित्रकलेचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दांडीत चित्रकलेचा मेळावा
दांडीत चित्रकलेचा मेळावा

दांडीत चित्रकलेचा मेळावा

sakal_logo
By

जीवन विकास शिक्षण संस्थेच्या अणुविकास विद्यालय दांडी येथे मोठ्या उत्साहात ‘सकाळ चित्रकला’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून अणुविकास विद्यालयाचे कलाशिक्षक भास्कर हिलाल खेडकर, तर सहाय्यक म्हणून कलाशिक्षिका उज्ज्वला विश्वनाथ मेहेर यांनी काम पाहिले.
अणुविकास इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका निवेदिता अमोल तामोरे, अणुविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय भास्कर राऊत यांच्यासह मनीषा खेडकर, सायली मोरे, श्रेया राऊत, रंजना तामोरे, तन्वी पागधरे यांचे सहकार्य लाभले.