उत्कर्ष विद्यालयात उत्स्फूर्त सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्कर्ष विद्यालयात उत्स्फूर्त सहभाग
उत्कर्ष विद्यालयात उत्स्फूर्त सहभाग

उत्कर्ष विद्यालयात उत्स्फूर्त सहभाग

sakal_logo
By

वसई, ता. २२ (बातमीदार) : विरार पश्चिम येथे उत्कर्ष विद्यालय या केंद्रावर झालेल्या बालचित्रकला स्पर्धेत पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चार गटांत पार पडलेल्या या स्पर्धेत वेळेअगोदरच मुलांनी केंद्रावर हजेरी लावली होती.
आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील आणि पालघर जिल्हा हाऊसिंग वेल्फेअरचे अध्यक्ष हार्दिक राऊत यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेविका व कवयित्री सुरेखा कुरकुरे यांनी केंद्राला भेट देत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. ‘सकाळ’ आयोजित करत असलेला हा उपक्रम मुलांच्या कलागुणांना नवे व्यासपीठ निर्माण करत आहे, अशा शब्दांत कुरकुरे यांनी मत व्यक्त केले. ही चित्रकला स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महेश रिंगे, जसमन न्यून्स, परशुराम हरीयाण आदींनी मेहनत घेतली. या ठिकाणी हाताला दुखापत झाली असतानाही एका विद्यार्थिनीने स्पर्धेत सहभाग घेतला.
--------------
वसई : विरार पश्चिम उत्कर्ष विद्यालयात कवयित्री तथा माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे यांनी भेट दिली.