पनवेलमधील शिवसृष्टीला नवा साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमधील शिवसृष्टीला नवा साज
पनवेलमधील शिवसृष्टीला नवा साज

पनवेलमधील शिवसृष्टीला नवा साज

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २३ (वार्ताहर)ः पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात पनवेलच्या वैभवात भर घालणारी शिवसृष्टी दीड कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे. या शिवसृष्टीचे पालिकेकडून पुन्हा सुशोभीकरण करण्यात येत आहे.
हुतात्मा स्मारकाशेजारी नगरपालिकेने १९८७-८८ च्या कालावधीत छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवला होता. तेव्हापासून या चौकाला शिवाजी चौक असे नाव पडले आहे. महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्यामुळे शहराला एक वेगळी ओळख मिळाली आहे; मात्र गेल्या २६ वर्षांपासून येथे फारशी डागडुजी वगैरे झाली नसल्याने या परिसराची काही प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे महापालिका स्थापन झाल्यानंतर महापालिकेने येथे शिवसृष्टी साकारली आहे. येथील दगडी भिंतीला शिवकालीन तटबंदीचे स्वरूप देण्यात आले आहे. तसेच ११ बुरुजांमुळे शिवकालीन तटबंदीचे स्वरूप आले आहे. तसेच मावळे, हत्तींच्या प्रतिकृतीसोबत अकरा मावळे, चार घोडेस्वार आणि तोफांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या परिसराला शिवसृष्टीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
---------------------------------
शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टी पाहण्यासाठी शिवप्रेमी येथे गर्दी करत असतात. त्यामुळे छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पाठीमागे आर्ट गॅलरी बनवण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेल्या वेगवेळ्या घटनांचे १४ शिल्प तयार करण्यात आले असून या माध्यमातून शिवकालीन इतिहास उलगडण्यात आला आहे.