Sun, Jan 29, 2023

लोकलमधील मोबाईल चोराला बेड्या
लोकलमधील मोबाईल चोराला बेड्या
Published on : 23 January 2023, 3:26 am
मुंबई, ता. २३ : लोकलमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल आणि लॅपटॉपची बॅग लंपास करणाऱ्या एका चोरट्यास वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण एक लाख ९६ हजार ४९० रुपये किमतीचे चार लॅपटॉप आणि तीन मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून बाबूराम रामनरेश चव्हाण (वय ४७) याला वरळी येथील मरीअम्मानगर येथून अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चार लॅपटॉप आणि तीन मोबाईल चोरल्याचे सांगितले. ही माहिती लोहमार्ग मुंबई गुन्हे विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम यांनी दिली.