बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्याला बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्याला बेड्या
बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्याला बेड्या

बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्याला बेड्या

sakal_logo
By

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : तीनवर्षीय बालिकेला मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या तरुणाने घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना काटईबाग परिसरात घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात पोक्सो व अत्याचारासह हत्येचा गुन्हा दाखल करून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

काटईबाग परिसरातील एका चाळीत मृत बालिका कुटुंबासह राहत होती. भीमकुमार मंडल (वय २६) हा १५ दिवसांपूर्वीच बिहार राज्यातील मधुबनी येथून तिच्या शेजारी राहण्यास आला होता. बालिकेला कधी खाऊ, तर कधी मोबाईल दाखवून त्याने तिच्याशी जवळिक वाढवली होती. रविवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे बालिका घरासमोर खेळत होती. त्या वेळी नराधमाने मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरात घेऊन गेला. त्यानंतर अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या केली. दुसरीकडे मुलगी घराबाहेर न दिसल्याने घरातील कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली; परंतु ती न सापडल्याने कुटुंबीयांनी निजामपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती.

दरवाजा तोडून घरात प्रवेश
पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असता, मुलीच्या घरापासून पाच-सहा घर सोडून एक घर बंदस्थितीत आढळले. त्यामुळे घराची कौले काढून आतमध्ये डोकावून बघितले असता नराधम व मुलगी दिसून आले. दरवाजा तोडून मध्यरात्रीच्या सुमारास घरात पोलिसांनी प्रवेश करून नराधमाला ताब्यात घेतले. त्यानंतर पंचनामा करत बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.