बोईसर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

बोईसर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

मनोर, ता. २४ (बातमीदार) : बोईसर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी डावलून तीन कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या सेवेत कायम करण्याचा बेकायदा ठरावप्रकरणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सरपंच दिलीप धोडी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. बेकायदा ठराव रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. २४) एका दिवसासाठी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
बोईसरच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला त्रस्त झाल्याचा आरोप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केला होता. ग्रामविकास अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी (ता. २४) एक दिवसाच्या काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. तीन कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या सेवेत कायम करण्याचा बेकायदेशीर ठराव रद्द करण्याची मागणीनंतर बोईसर ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप धोडी यांनी आंदोलन करण्याच्या इशारा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. चर्चेअंती सरपंचांनी दिलेल्या आश्वासनावर कर्मचाऱ्यांचे समाधान झाल्यानंतर काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

---------------
ठराव रद्द करण्याचे आश्वासन
बोईसर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तीन कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्यासाठी घेतलेला ठराव रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com