उल्हासनगरातील १८ शिक्षित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरातील १८ शिक्षित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती
उल्हासनगरातील १८ शिक्षित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती

उल्हासनगरातील १८ शिक्षित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : शिक्षित असलेल्या उल्हासनगर महापालिकेतील १८ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात १६ सफाई कामगार आणि दोन सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार चतुर्थश्रेणीतील १८ शिक्षित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात मिळालेल्या या भेटीने कर्मचारी सुखावून गेल्याची माहिती मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
पदोन्नती देण्यात आलेल्यांमध्‍ये सुरक्षा रक्षक साहेबराव सावळे, हरेश नागपुरे, सफाई कामगार जितेंद्र राठी, भरत खरात, सुनील डागर, परेश निकम, अनिल राठी, अविनाश महाले, संदीप विडलान, रवींद्र बेहनवाल, कविता शिरवाळे, रवी टाक, आकाश शिंदे, मनीष बिडलान, गौरव जेथे, गणेश भोकटे, अनिकेत लांजवळ, अरुण भोईर यांचा समावेश आहे. कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती करण्यात आलेल्या या सर्व १८ कर्मचाऱ्यांना विविध विभागांत रुजू करणार असल्याचे मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी सांगितले.