Fri, Feb 3, 2023

मुरबाड शहरात बाळासाहेबांची जयंती साजरी
मुरबाड शहरात बाळासाहेबांची जयंती साजरी
Published on : 25 January 2023, 10:17 am
मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : मुरबाड शहर व तालुक्यात ठिकठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. मुरबाड शहरातील शिवाजी चौकात बाळासाहेबांची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती. या प्रतिमेचे शिवसैनिक; तसेच मुरबाडमधील नागरिकांनी दर्शन घेऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख मधुकर घुडे, शिवसेना मुरबाड तालुकाप्रमुख संतोष विशे, उपतालुकाप्रमुख रमेश कार्ले, मुरबाड शहरप्रमुख प्रशांत मोरे, ज्येष्ठ नेत्या सुनीता ढमके आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.