वाड्यातील शिवसैनिकांची किल्ले रायगडावर दर्शनवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यातील शिवसैनिकांची किल्ले रायगडावर दर्शनवारी
वाड्यातील शिवसैनिकांची किल्ले रायगडावर दर्शनवारी

वाड्यातील शिवसैनिकांची किल्ले रायगडावर दर्शनवारी

sakal_logo
By

वाडा, ता. २५ (बातमीदार) : शिवसेनेचे पालघर सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाडा शहर शाखेच्या वतीने ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले रायगड दर्शनवारीचे आयोजन करण्यात आले होते. मुरबाड येथील म्हसा या गावात भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख व माजी आमदार रूपेश म्हात्रे, ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हाप्रमुख अप्पा घुडे, मुरबाड शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विशे, उपतालुकाप्रमुख रमेश कुर्ले यांनी शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाड तालुक्याचे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख अमित मोरे, महाड शिवसेना तालुकाप्रमुख आशिष पळसकर यांनी शिवसैनिकांची भेट घेऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपतालुकप्रमुख तुषार यादव, तालुका समन्वयक प्रकाश केणे व जितेंद्र अधिकारी, तालुका सचिव नीलेश पाटील, शहरप्रमुख प्रमोद घोलप, उपशहरप्रमुख शैलेश साळुंखे, सचिन वडजे, कुणाल पाटील, भाऊ भानुशाली, कुंदन डेगाणे, शहरसंघटक चंद्रकांत मलबारी, विलास गायकवाड, भरत गायकवाड, डी. व्ही. पाटील, रोहिदास पाटील, अजिंक्य पाटील, संजय पातकर, प्रकाश जाधव, भाई कराळे, संतोष भोईर, अजित पाटील, योगेश मलबारी, सचिन देहेरकर, संदीप रोडगे, उमाकांत पाटील, शाहनवाज शेख, नयन मलबारी, तुषार भानुशाली, चेतन भोईर, आकाश पागी, सागर जाधव, तनवीर ढोणे, सनी कोलेकर, सागर गुप्ता, सागर पाटील व सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांनी विशेष मेहनत घेतली.