कुणबी, मराठा समाजासाठी मोफत संगणक अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणबी, मराठा समाजासाठी मोफत संगणक अभ्यासक्रम
कुणबी, मराठा समाजासाठी मोफत संगणक अभ्यासक्रम

कुणबी, मराठा समाजासाठी मोफत संगणक अभ्यासक्रम

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), नियोजन विभागाअंतर्गत महाराष्ट्र सरकारची स्थायत संस्था व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन-क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी २० हजार रुपये शुल्क असलेला संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण नि:शुल्क देण्यात येणार आहे.
१८ ते ४५ वयोगटातील गरजू व इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जामधून निकषाच्या आधारे अर्जाची छाननी करून प्रथम येणाऱ्या निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. पात्र उमेदवारांची यादी www.mkcl.org/csmsdeep या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षणाचा खर्च सारथी पुणे मार्फत करण्यात येईल. १६ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून १ फेब्रुवारी ते असेल. प्रशिक्षण नवीन पनवेलमध्ये शाहू इन्स्टिट्यूट या नामांकित संस्थेमध्ये मिळणार असून आहे. यासाठी किमान दहावी उत्तीर्ण अनिवार्य आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे. अधिक माहितीसाठी नवीन पनवेल येथील शाहू इन्स्टिट्युटला भेट द्यावी, अथवा ९८७०९११९११, ९३२४२४२९३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एमकेसीएलचे कोकण विभागीय अध्यक्ष जयंत भगत यांनी केले आहे.