
परीक्षा पे चर्चा चित्रकला स्पर्धा उत्साहात
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा उपक्रमांतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शाळांमधील नववी ते बारावीमधील ४५५ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. भाईंदर पश्चिम येथील जे. एच. पोद्दार शाळा व मिरा रोड येथील महापालिकेचे धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व विपश्यना केंद्र येथील सभागृहात या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेसाठी जी-२० जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आजादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणात भारत नंबर वन, पंतप्रधान जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योग दिन मोदींजींनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाओ बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला, मोदींचा संवेदनशील निर्णय हे दहा विषय देण्यात आले होते. आयुक्त दिलीप ढोले यांनी त्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयांवर साकारलेल्या चित्रांची पाहणी केली. या वेळी शिक्षण विभागाच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे, शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर, महानगरपालिका शालेय मुख्याध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते.