निर्देशांक सव्वा टक्का पडले निफ्टी अठरा हजारांखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक सव्वा टक्का पडले निफ्टी अठरा हजारांखाली
निर्देशांक सव्वा टक्का पडले निफ्टी अठरा हजारांखाली

निर्देशांक सव्वा टक्का पडले निफ्टी अठरा हजारांखाली

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : केंद्रीय अर्थसंकल्प तसेच अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीतील निर्णयांच्या धास्तीमुळे आज भारतीय शेअरबाजार निर्देशांक सव्वा टक्का घसरले. निफ्टी २२६.३५ अंशांनी कोसळून अठरा हजारांच्या खाली आला; तर सेन्सेक्स ७७३.६९ अंशांनी गडगडला.

आजच्या धास्तीमुळे व्यवहारांना सुरुवात होतानाच निर्देशांक घसरले होते. दिवसभरात विक्रीचा मारा झाल्याने ही घसरण आणखी वाढली. बँका व आयटी कंपन्यांचे शेअर जास्त कोलमडले. त्यातच परदेशी वित्तसंस्थांनीदेखील विक्रीचा मारा केल्याने तोटा आणखीनच वाढला. दिवसअखेर सेन्सेक्स ६०,२०५.०६ अंशांवर; तर निफ्टी १७,८९१.९५ अंशांवर स्थिरावला.

आज निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३५ शेअरचे भाव घसरले; तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी २४ चे भाव घसरले. एनएसईवरील १,५९० शेअर आज तोट्यात होते; तर फक्त ४४७ शेअर नफ्यात होते. बीएसईवरील १,०३७ शेअर नफ्यात; तर २,४९२ शेअर तोट्यात होते. आज मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर व टाटा स्टील या शेअरचे भाव एक टक्क्याच्या आसपास वाढले; तर इंडसइंड बँक व स्टेट बँक चार टक्क्यांपेक्षा जास्त कोलमडले. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, टेक महिंद्र, आयसीआयसीआय बँक या शेअरचे भाव दोन ते तीन टक्के पडले. अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, विप्रो, बजाज फिनसर्व्ह यांचे भाव एक ते दोन टक्के पडले.

कोट
..........
आज बाजारात देशी व परदेशी घडामोडींची धास्ती होतीच; मात्र परदेशी वित्तसंस्थांचा पैसा जास्त नफा देणाऱ्या अन्य आकर्षक मूल्यांकन असलेल्या बाजारांमध्ये जात असल्याने त्यांनी भारतात विक्री केली. - विनोद नायर, जिओजित फायनान्स.