
महात्मा गांधी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात
अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार) : दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ संचालित महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिलीप भोळे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शिशुवाटिका आणि इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. शिशुवाटिकेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची वेशभूषा करून त्यांना मानवंदना दिली. तसेच बालभवनच्या विद्यार्थ्यांनी बांबूनृत्य सादर केले. पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी कवायत, साधन कवायत, योगासनांचे प्रकार, मानवी मनोरे, कराटे, लेझीम इत्यादींसह शिक्षकांनीही ढोल ताशा पथकाचे सादरीकरण केले. या वेळी संस्थेचे कार्यवाह सुधींद्र शुरपाली, संतोष भणगे, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.