Wed, March 22, 2023

वासिंदमध्ये रंगल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा
वासिंदमध्ये रंगल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा
Published on : 28 January 2023, 10:39 am
वासिंद, ता. २८ (बातमीदार) : आम्ही वासिंदकर समूहातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा व कारगिल विजयगाथा’ या स्फूर्तिदायक व सुरेल कार्यक्रमातून देशाच्या महान शूरवीरांच्या आठवणी जागवत वासिंदकरांनी त्यांना मानवंदना दिली. न्यू आयडियल स्कूलच्या सभागृहात मुंबईचे गायक व निवेदक अश्विनी देशपांडे, अजय देशपांडे, सुहास फडके यांनी राजमाता जिजाऊ, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कारगिलचे विजयवीर यांच्या अजोड पराक्रमाचे आणि असिम देशभक्तीचे रोमांचकारी वर्णन करताना भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, शौर्यशाली श्रेष्ठत्वाचे दर्शन घडवले. या वेळी अशोक मीनाक्षी, सुनीता म्हात्रे, तनुजा महाजन, प्रकाश चव्हाण यांनी उत्तम साथ दिली.