उल्हासनगरात मिसाईल आणि तोफेचे प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात मिसाईल आणि तोफेचे प्रात्यक्षिक
उल्हासनगरात मिसाईल आणि तोफेचे प्रात्यक्षिक

उल्हासनगरात मिसाईल आणि तोफेचे प्रात्यक्षिक

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : प्रजासत्ताक दिनानिमित्त उल्हासनगरातील आरकेटी कॉलेजच्या पुढाकाराने मिसाईल आणि तोफेच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ही प्रात्यक्षिके बघून पोलिस अधिकारी आणि मान्यवर अवाक झाले होते. कॅम्प नंबर तीनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आरकेटी कॉलेजने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कॅप्टन भरत बडगुजर आणि त्यांचे एनसीसीचे कॅडेट यांनी एक मिसाईल आणि तोफदेखील यावेळी बनवली होती. या तोफेचे प्रात्यक्षिकदेखील या वेळी करून दाखवण्यात आले. तसेच भारतीय तिरंगामधील १९४७ पासून ते आतापर्यंत झालेले बदलदेखील उपस्थितांसमोर ठेवण्यात आले. या सोहळ्याला मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, कॉलेजच्या प्राचार्या गीता मेनन यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.