पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने सहा महिन्यांचा कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने सहा महिन्यांचा कारावास
पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने सहा महिन्यांचा कारावास

पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने सहा महिन्यांचा कारावास

sakal_logo
By

ठाणे, ता. २८ (वार्ताहर) : तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवून जंगलात नेत अत्याचार करत तिची हत्या केली. त्यानंतर तिला झाडाला लटकावून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी आरोपी सागर वामन मालवकर याने पोलिसांना चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एन. शिरसीकर यांनी सात वर्षे कारागृहात राहिल्यानंतरही सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

सागर मालवकर याने शर्मिला हिला २५ मार्च २०१६ रोजी पालघर जिल्ह्यातील शिलोत्तर येथे लग्न समारंभासाठी बोलावले. २६ मार्चच्या रात्री त्याने तिला निर्जनस्थळी नेत अत्याचार करत हत्या केली. शर्मिलाने आत्महत्या केल्याचे २७ मार्चला त्याने वाडा पोलिसांना सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. त्यानंतर वाडा पोलिसांनी सागरला अटक केली होती. त्याच्यावर हत्या, अत्याचार आणि चुकीची माहिती प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचे लग्न झालेले असून त्याला मुले होती. मात्र शर्मिला त्याला लग्न करण्यासाठी तगादा लावत होती, असे त्याने पोलिसांना सांगितले. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानुसार न्यायमूर्ती शिरसीकर यांनी सागरने पोलिसांना दिलेल्या चुकीच्या माहितीची दखल घेतली. त्याच्याविरोधात चुकीची माहिती देण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सागर हा २७ मार्च, २०१६ पासून कारागृहात बंदिस्त असून पुढील कारवाई सुरू राहील, असा निकाल दिला.