जबरदस्तीने गर्भपातप्रकरणी दोघांची निर्दोष सुटका

जबरदस्तीने गर्भपातप्रकरणी दोघांची निर्दोष सुटका

ठाणे, ता. ३१ (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील खर्डी परिसरात विवाहितेवर अत्याचार आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणातील दोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी ठाणे सत्र न्यायालयाने सुटका केली.

रंगनाथ हरिभाऊ तांगडी (वय ४७) आणि रामदास वामन तांगडी (६२) यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याने त्यांची सुटका केल्याचे न्यायमूर्ती रचना तेहरा यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आरोपी डॉ. डोंगरसिंग गुमानसिंग धनवट याचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. रंगनाथ हा पीडितेच्या २००९ पासून संपर्कात होता. त्याने महिलेला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर त्याने दुसऱ्याशी विवाह केला. त्यानंतरही त्याने महिलेशी संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली. आरोपीने गर्भपात करण्यासाठी सांगताच पीडितेने नकार दिल्यावर तिला जबरदस्तीने डॉक्टरकडे नेत गर्भपात केला. या प्रकरणी रामदास हा त्याला मदत करीत होता, असे न्यायालयात सांगण्यात आले. या प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने धनंजय पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयात सरकारी पक्षाने आरोपींनी पीडितेला धमकावल्याचा, तसेच लग्नाच्या भूलथापा मारल्याचा पुरावा, डॉक्टरांनी जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा पुरावा सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याने दोन्ही आरोपींना निर्दोष सोडण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com