Tue, March 21, 2023

विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसोबत आरोग्य विमा
विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसोबत आरोग्य विमा
Published on : 30 January 2023, 10:42 am
कोपरखैरणे (बातमीदार) : स्वयं विकास परिवार फाऊंडेशनतर्फे पाचवी ते डिप्लोमाधारक गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबत एक लाखाचा आरोग्य विमा कवच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. स्कॉलरशिप ही तीन गटांत होणार असून, प्रत्येकी प्रथम सहा क्रमांक काढण्यात येणार आहेत. या परीक्षेतून उत्तेजनार्थ १२० पारितोषिक देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे बन्सी मोरे यांनी सांगितले.