जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांचा सन्मान

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांचा सन्मान

मानखुर्द, ता. १ (बातमीदार) ः मुंबई उत्तर विभागामध्ये आयोजित तीनदिवसीय शालेय विज्ञान प्रदर्शनाचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (ता. २७) मुलुंड पश्चिम येथील वाणी विद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाच्‍या प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण निरीक्षक ऊर्मिला पारधे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजक गजानंद बनसोडे, उपशिक्षण निरीक्षक पूजा चव्हाण, सहायक शिक्षण निरीक्षक भावराव मोहिते यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी वाणी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचाही सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये एम पूर्व विभागातील नूतन विद्यालयाने वरिष्ठ विभागात प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. एम पश्चिम विभागातील सरस्वती विद्यालयाने कनिष्ठ गटातून प्रथम क्रमांक पटकावला. भांडुपच्या अहिल्या विद्यालय वरिष्ठ गट; तर प्रोग्रेसिव्ह स्कूल, एक्सलन्स स्कूल एस. एम. शेट्टीवार तसेच अपंग विद्यार्थी प्रकल्प क्रमांक १ या सर्वांना गौरवण्यात आले. प्रभाग संयोजिका विद्या फाळके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com