चारोटी उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार 
खाली पडल्याने गंभीर जखमी

चारोटी उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार खाली पडल्याने गंभीर जखमी

कासा, ता. ३० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी उड्डाण पुलावर दुभाजकास धडक देत दुचाकीचालक उड्डाण पुलाच्या खाली कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. संजीव सिंग हा सोमवारी (ता. ३०) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात दुचाकीवरून वसईकडे जात असताना चारोटी उड्डाण पुलावरील वळणावर वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले. दुभाजकावर धडकल्यानंतर त्याची दुचाकी उड्डाण पुलावर राहिली; मात्र चालक उड्डाण पुलाखाली कोसळला. जवळपास ३० फूट खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती कळताच चारोटी महामार्ग पोलिस, तसेच कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचून संजीव याला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तो गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी वसई येथे पाठविण्यात आल्याचे कासा पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रजासत्ताक दिनी सुद्धा एका दुचाकी चालकाचा महामार्गावर अपघाती मृत्यू; तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com