Sat, June 10, 2023

वालीवमध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात
वालीवमध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात
Published on : 30 January 2023, 12:13 pm
विरार, ता. ३० (बातमीदार) : अभ्युदय को. ऑप. बँकेच्या वालीव शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वसई पूर्वेतील वालीव येथील किचन गार्डनमध्ये शाळकरी मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कलाकार जागृत व्हावा यासाठी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील शाळकरी मुला-मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून यथोचित सन्मान करण्यात आल्याची माहिती अभ्युदय बँकेचे वालीव शाखेचे शाखा व्यवस्थापक सुनिल कदम यांनी दिली.