अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव उत्साहात
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव उत्साहात

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव उत्साहात

sakal_logo
By

विरार, ता. ३१ (बातमीदार) : वसई येथील विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर वैविध्यपूर्णतेचे रंग उधळत आणि एकात्मतेचा संदेश देत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ‘संगम : एक सांस्कृतिक विरंगुळा’ या संकल्पनेवर आधारित हा सोहळा विद्यावर्धिनीच्या सी. आर. राजाणी सभागृहात दोन दिवसांत चार सत्रांमध्ये साजरा करण्यात आला. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य परंपरांमधील बेलीडान्स, हिप-हॉप, फ्युजन, रिमिक्स आणि लावणी, कोळी, गरबा, जोगवा, भरतनाट्यम् अशा वैविध्यपूर्ण नृत्यप्रकारांनी हा सोहळा सजला होता. विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग गजानन नाईक, खजिनदार हसमुखभाई शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, उपप्राचार्य डॉ. जानकी सावगाव व डॉ. अनिलकुमार शेळके आणि प्रबंधक दिलीप वर्तक तसेच विविध समित्यांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत या वार्षिकोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सखाराम डाखोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. श्रीराम डोंगरे, प्रा. आदिती यादव, प्रा. लतिका पाटील आणि सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.