Thur, March 23, 2023

मंदिरात चोरी करणारा अटकेत
मंदिरात चोरी करणारा अटकेत
Published on : 30 January 2023, 3:59 am
मुंबई, ता. ३० : पुजाऱ्याच्या वेशात जैन मंदिरात जाऊन पूजेच्या बहाण्याने चोरी करणाऱ्याला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. भरत दोशी असे अटक केलेल्याचे नाव आहे. टीव्ही मालिकेतून प्रेरणा घेत भरत दररोज तीन ते चार मंदिरांत पूजेच्या बहाण्याने मंदिरात जाऊन संधी मिळेल तेव्हा तेथून वस्तू चोरून नेत असे. मालाड येथील जैन मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तेथील पुजाऱ्याने दिंडोशी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोराला अटक केली. त्याच्याकडून सोन्याची भांडी आणि काही वस्तू जप्त केल्या आहेत. हस्तगत केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे पाच लाख ३० हजार आहे.