सातीवली येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातीवली येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात
सातीवली येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात

सातीवली येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात

sakal_logo
By

विरार, ता. ३१ (बातमीदार) : वसईमधील सातीवली येथे हळदी कुंकू समारंभ पार पडला. या समारंभाला माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांच्या समवेत बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सातीवली विभागातील माजी नगरसेवक सुनिल आचोळकर यांच्या वाढदिवसनिमित्त सातिवली महिला मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वसई-विरार महापालिकेच्या माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत वसई-विरार महापालिकेचे परिवहन सभापती भरत गुप्ता, माजी सभापती कन्हैया भोईर, माजी सभापती रमेश घोरकना, बहुजन विकास आघाडीचे रणधीर कांबळे, मोफत अली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.