
कुशल वर्गवारीत ११७४ पदांना स्थान
नेरूळ, ता. ३१ (बातमीदार) ः हे वर्ष सर्वसमावेशक कंत्राटाचे शेवटचे वर्ष आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत नवीन सर्वसमावेशक कंत्राटावेळी आर्थिक खर्चाची तरतूद करून सुधारित कुशल वर्गवारीनुसार निविदा तयार करण्यासंदर्भात सर्व विभागप्रमुखांना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सूचित केले आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने आमदार शशिकांत शिंदे, तेजस शिंदे, सरचिटणीस विठ्ठल गोळे, उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त आणि शहर अभियंता यांची भेट घेऊन शहर अभियंता विभागातील काही टेक्निकल पदांना कुशल वर्गवारीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शहर अभियंता यांनी तसा अहवाल तांत्रिक मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी ही सूचना केली आहे.
सदर कुशलसाठी १,१७४ पदांना यात पंप ऑपरेटर /पीएलसी ऑपरेटर, प्लंबर, मीटर रीडर, वायरमन, पर्यवेक्षक, फिटर, वाहन चालक, अशा इतर काही टेक्निकल पदांना याचा लाभ होणार आहे. त्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. ही कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रवादी युनियनने आजपर्यंत जे विषय हाती घेतले आहेत ते मार्गी लागताना दिसत आहेत. लवकरच समान काम समान वेतनचा विषय मार्गी लागणार, असे नवी मुंबई राष्ट्रवादी महापालिका युनियन अध्यक्ष यांनी सांगितले. सदर विषयासाठी नवी मुंबई महापलिका राष्ट्रवादी युनियनचे अध्यक्ष संजय सुतार, सरचिटणीस चंद्रकांत चिकणे, उपाध्यक्ष अजय सुपेकर, बाळकृष्ण कदम, राजेश बगेरा, प्रशांत खोडदे, विजय बागडे, मच्छिंद्र ठाकूर, भूपेश तांडेल, नितीन बांगर, दुर्गेश कोळी, गणेश भंडारी, विशाल येशरे, रमेश मांगले, सुभाष ठाकूर, प्रसाद कोळी. ललित भोईर, विकास पाटील, योगेश वैती आदी संघटक व पदाधिकारी यांनी पाठपुरवठा केला आहे.