
मुंबई ते सुरथकल दरम्यान १८ विशेष एक्स्प्रेस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : हिवाळी/आंगणेवाडी उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सुरथकल दरम्यान १८ विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. ०१४५३ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि सुरथकल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्र. ०१४५४ सुरथकलहून ४ फेब्रुवारी २०२३ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत दर शनिवारी संध्याकाळी ७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या दोन्ही एक्स्प्रेस ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुम्ता, मुरुडेश्वर, भटकल, मुकाम्बिका रोड, बैंदूर, कुंडापुरा, उडुपी आणि मुल्की स्थानकांवर थांबेल. या विशेष गाड्यांचे आरक्षण ३१ जानेवारी २०२२ पासून रेल्वे आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू होणार आहेत.