ट्रस्टच्या वादातून प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रस्टच्या वादातून प्राणघातक हल्ला
ट्रस्टच्या वादातून प्राणघातक हल्ला

ट्रस्टच्या वादातून प्राणघातक हल्ला

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ३१ (बातमीदार) : मस्जिद ट्रस्टवर वर्चस्व कोणाचे, यावरून झालेल्या वादातून नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गावात एकावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सोमवारी (ता. ३०) रात्री घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विनायक जाधव यांनी दिली. मुसावीर दायर असे जखमी इसमाचे नाव आहे तर मोहम्मद अबरार (वय ३८), मोहम्मद इम्तियाज खान (वय ३६), मोहम्मद इर्शाद खान (वय ३९), इम्रान शेख (वय ३२), अथहसर अफजल खान (वय २८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण सोपारा गाव टाकीपाडा परिसरातील राहणारे आहेत. या गावातील मस्जिदच्या ट्रस्टवरून आपापसात वाद निर्माण झाले होते. त्यातून हा हल्ला झाला. आरोपींनी मुसावीर दायर याच्यावर धारदार चाकूने तीन वार केले.