Fri, June 2, 2023

७५९ टॅक्सी चालकांवर पाच महिन्यात कारवाई
७५९ टॅक्सी चालकांवर पाच महिन्यात कारवाई
Published on : 31 January 2023, 4:48 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : प्रादेशिक परिवहन ताडदेव कार्यालयाच्या वतीने मध्य मुंबईत मोटार वाहन कायद्यांतर्गत नियम मोडणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यांत सुमारे ७५९ टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये भाडे नाकारणाऱ्या ७१५ चालकांवर कारवाई केल्याची माहिती परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे. जादा भाडे वसुली ३५, प्रवाशांना वाईट वागणूक देण्याच्या ९ घटना घडल्या असून, अशा एकूण ७५९ तक्रारी भरारी पथकाकडे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १७० तक्रारी ‘ऑन स्पॉट’ सोडवण्यात आल्या आहे; तर ५८९ तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती कळसकर यांनी दिली.