एपीएमसीतील बेशिस्त वाहतूक रडारवर

एपीएमसीतील बेशिस्त वाहतूक रडारवर

तुर्भे, ता. १ (बातमीदार)ः आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ एपीएमसीत सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात एपीएमसी पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला असून दिड महिन्यात ३ हजार ६६८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य तसेच परराज्यांतून दररोज हजारो ट्रक येत असतात. त्यामुळे ६०० हून अधिक ट्रकच्या पार्किंगसाठी सिडकोने सेक्टर १९ मध्ये ट्रक टर्मिनल उभारले होते. पण सध्या सिडकोने या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला असून ट्रक टर्मिनलसाठी फळ मार्केटसमोरील तुर्भे एसटी डेपोचा भूखंड उपलब्ध करून दिला आहे. पण या भूखंडावर फक्त १५० ट्रक पार्क होऊ शकत असल्याने अन्य ट्रक व लहान मोठे टेम्पो, वाहने एपीएमसीच्या लगत असलेले सर्विस रोड किंवा अन्य ठिकाणी पार्क केले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांनी १ हजार २७६ वाहनांवर कारवाई केली आहे; तर अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ३९२ वाहनांवरही कारवाई आली आहे.
----------------------------------
रिक्षाचालक आणि मालक यांच्या बैठका घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागल्याचे दिसत आहे. सर्वांनी वाहतूक नियम पाळावेत, यासाठी जनजागृतीही केली जात आहे.
- विमल बिडवे, वाहतूक पोलिस निरीक्षक, एपीएमसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com