
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३
शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याची केंद्राने घोषणा आणि स्वामिनाथन समितीच्या अंमलबजावणी संदर्भात अर्थसंकल्पात काहीही उल्लेख नाही. शरद पवार यांनी राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे तिप्पट उत्पन्न वाढवणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग यातून झाला आहे. त्याचबरोबर देशाच्या अर्थकरणात सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राची घोर निराशा करणारा हा बजेट आहे. आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून मध्यमवर्गीयांना सवलती देणारा हा राजकीय बजेट आहे.
- खा. सुनील तटकरे
---
मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. गृह बांधणीच्या खर्च काही प्रमाणात कमी होईल, त्याचबरोबर मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न साकार होण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २.५० लाखापर्यंत अनुदानात वाढ करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प गृहक्षेत्रासाठी दिलासादायक आहे.
- प्रशांत नाईक, एबी बिल्डर्स, अलिबाग
---
एकंदरीतच अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक आहे. सहकार क्षेत्रासाठी विविध योजना घोषित करण्यात आल्या आहेत. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. तर २ लाखांपर्यंत प्राथमिक-कृषी पतसंस्थांचा कर काढून टाकण्यात आला आहे.(सेक्सन १९४) नुसार १ कोटीपेक्षा जास्त रक्कमेवर टीडीएस कापला जायचा, ती मर्यादा ३ कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे. उत्पादन करणाऱ्या सहकारी संस्थांचा कर २२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणण्यात आले आहे.
- उदय जोशी, राष्ट्रीय महामंत्री, सहकार भारती
---
एलईडी टीव्ही, अत्याधुनिक कॅमेरे, कॅमेरे लेन्स, मोबाईल स्वस्त होणार आहे. फोटोग्राफीसाठी आवश्यक प्रिंटिंग साहित्यावरही कर कमी होणार असल्याने व्यावसायिक फोटोग्राफी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यातील होईल. डिजिटल साहित्य खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य होईल. डिजिटलच्या जमान्यात हे अत्यावश्यक होते.
- सुजल राऊत, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रेता