लेटलतिफ कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रीक’चा चाप

लेटलतिफ कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रीक’चा चाप

पालघर, ता. २ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयामध्ये काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशिराने येत असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाट पाहत बसावे लागते. यामुळे नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी अधिकारी व कर्मचारीवर्गाला वेळेची शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने बायोमेट्रिक प्रणाली १ फेब्रुवारीपासून अंमलात आणली आहे. यामुळे लेटलतीफ लेटलतीफ कर्मचाऱ्यांना चाप बसणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. भानुदास पालवे यांनी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावून शुभारंभ केला.
जिल्हा परिषद प्रवेशद्वार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या बाहेर बायोमेट्रिक हजेरीची तीन मशीन बसवण्यात आली आहेत. यात २१३ अधिकारी व कर्मचारी यांची नोंदणी करण्यात आली असून अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामानिमित्त फिरतीवर असल्याने १८१ कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावली. बायमेट्रिक हजेरी सर्व कर्मचारी व अधिकारी यांना बंधनकारक असून या पद्धतीमुळे कर्मचारी व अधिकारी यांच्या नियमित वेळेची नोंद होऊन सर्व कर्मचारी वेळेत कार्यालयात येतील, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.
नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यालयीन भेटी दिल्यानंतर अनेक अधिकारी आणि कर्मचारी वेळेत कामावर येत नसल्याने निदर्शनास आले होते. असे प्रकार वारंवार घडू लागल्यानंतर उशिरा येणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; तरीही कर्मचारी, अधिकारी वेळेवर येत नसल्याने बायोमेट्रिक हजेरी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com