वाहनाच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २) सायंकाळी घडली. नेरूळ येथील शिरवणे ब्रिजवर हा अपघात झाला. रोशन ग्यानी वाल्मीकी (वय २७) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

रोशन वाल्मीकी हा कात्रज पुणे येथे कार वॉशिंगचे काम करत होता. त्याची पत्नी व मुले बेलापूर येथे राहण्यास होती. रोशनची पत्नी व मुले मूळ गावी जाणार असल्याने तो गुरुवारी सकाळीच पुणे येथून स्कुटी घेऊन नवी मुंबईत आला होता. दुपारी पत्नी आणि मुलांना गावी जाणाऱ्या गाडीत बसवून तो पुन्हा आपल्या स्कुटीवरून पुणे येथे परतत होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याची स्कुटी शिरवणे येथील ब्रिजवर आली असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला नेरूळमधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com