अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात एड्सबाबत जनजागृती रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात  एड्सबाबत जनजागृती रॅली
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात एड्सबाबत जनजागृती रॅली

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात एड्सबाबत जनजागृती रॅली

sakal_logo
By

विरार, ता. ४ (बातमीदार) : अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी नुकतीच वर्तक महाविद्यालय ते शास्त्रीनगर अशी एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी लाल रिबिन बांधून एड्स रुग्णांप्रति संवेदनशीलता व्यक्त केली; तसेच विविध घोषवाक्यांद्वारे जनतेला एड्सचा प्रसार टाळण्याचे आवाहन केले. एचआयव्ही एड्स या विषयातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमित पटेल हे या प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांना समाजातील सर्व स्तरांमध्ये एड्सबाबत जागृती निर्माण करण्याची गरज आहे, असे सांगून त्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. या रॅलीसाठी अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे तसेच भाऊसाहेब वर्तक तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ कव्हाळे यांनी शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शत्रुघ्न फड व प्रा. आदिती यादव यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच माजी रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी सुनील बिंद याने विशेष परिश्रम घेतले.