सेवा विवेकच्या कार्याचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा विवेकच्या कार्याचा सन्मान
सेवा विवेकच्या कार्याचा सन्मान

सेवा विवेकच्या कार्याचा सन्मान

sakal_logo
By

विरार, ता. ४ (बातमीदार) : राष्ट्रीय समाज एम्प्लॉईज फेडरेशन-रासेफ आयोजित राष्ट्रीय समाज यशवंत गौरव सन्मान २०२३ हा पुरस्कार सेवा विवेक सामाजिक संस्थेला सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान करण्यात आला. सिद्धरामानंद स्वामी (कोगनोळी, कानका गुरुपीठ कर्नाटक), मुख्य न्यायाधीश वी. ईश्वररीह (आंध्र प्रदेश), एस. एल. अक्किसागर यांच्या हस्ते सेवा विवेक सामाजिक संस्थेचे बांबू सेवक राहुल भंडारकर व उमेश गुप्ता यांना देण्यात आला. हा कार्यक्रम चर्चगेट येथील आय. एम. सी. चेंबर्स येथे पार पडला. ज्यांनी स्वतःच्या बळावर आणि उपेक्षित वंचिततेतून संघर्ष करून एक स्थान प्राप्त केले आहे. तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय, मीडिया, वैद्यकीय आणि कायदा इत्यादी क्षेत्रांमध्ये शून्यापासून सुरुवात केली, अशा ११ व्यक्तींचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला.