Tue, March 21, 2023

वसई-विरारमध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात
वसई-विरारमध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात
Published on : 4 February 2023, 10:59 am
विरार, ता. ४ (बातमीदार) : भारतीय जनता पार्टी वसई-विरार जिल्ह्याच्या वतीने शालेय चित्रकला स्पर्धांचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आले होते. संपूर्ण देशभर प्रत्येक तालुक्यात ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. या स्पर्धेत १६ शाळांमधील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बक्षीस समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून गांधी विचारांचे अभ्यासक व संत मीराबाई यांच्या जीवनावर लिहिलेल्या कांदबरीचे लेखक प्रा. मॅक्सवेल लोपीस उपस्थित होते. या वेळी सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे, चंद्रशेखर धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.