Wed, May 31, 2023

फोर्टिस रुग्णालयात कॅन्सर रुग्णांचा टॅलेंट शो
फोर्टिस रुग्णालयात कॅन्सर रुग्णांचा टॅलेंट शो
Published on : 5 February 2023, 9:54 am
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात कर्करोग रुग्णांच्या ‘टॅलेंट शो’ चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात १४० हून अधिक कॅन्सर रुग्णांनी सहभाग घेतला. रुग्णांचे मनोबल वाढावे आणि त्यांना कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकता यावी, या आशेने कर्करोग रुग्णांच्या कलात्मकतेचे दर्शन घडवण्यात आले. फोर्टिस रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. नारायणी म्हणाले की, उपचारादरम्यान व उपचारानंतर कर्करोगग्रस्त रुग्णाची मानसिकता व शारीरिक वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच आम्ही रुग्णांसाठी खास टॅलेंट शोचे आयोजन केले. रुग्णांनीदेखील यात उत्कृष्ट कला सादर केली.