शिक्षकाकडून बालकांवर लैंगिक अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकाकडून बालकांवर लैंगिक अत्याचार
शिक्षकाकडून बालकांवर लैंगिक अत्याचार

शिक्षकाकडून बालकांवर लैंगिक अत्याचार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : अरबी व उर्दू भाषा शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागात घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जोगेश्वरीत सहा वर्षांची मुलगी व मुलगा यांना उर्दू व अरबी भाषेचे धडे देण्यासाठी आरोपी पीडित मुलांच्या घरी येत असे. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून आरोपीने पीडित मुलांवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती पीडित मुलांच्या आईला मिळाल्यानंतर तिने ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपीला शुक्रवारी (ता.३) रात्री अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी ४ डिसेंबर २०२२ पासून पीडित मुलांना अरबी व उर्दू भाषा शिकवण्यासाठी त्यांच्या घरी येत होता.