शिवाई बालक मंदिरात विमानतळ प्रतिकृती प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाई बालक मंदिरात विमानतळ प्रतिकृती प्रदर्शन
शिवाई बालक मंदिरात विमानतळ प्रतिकृती प्रदर्शन

शिवाई बालक मंदिरात विमानतळ प्रतिकृती प्रदर्शन

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ५ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करिअरच्या विविध संधीविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी शिवाई बालक मंदिर शाळेने इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांसाठी विमानतळाच्या संपूर्ण प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन पायलट अजिंक्य जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करिअरच्या विविध संधींविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्यासाठी सल्ला दिला. या प्रदर्शनात उडणारे ड्रोन, हेलिकॉप्टर, विमाने पाहून विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला. या वेळी शाळेच्या विश्वस्त मंडळाच्या कोषाध्यक्ष ॲड. शिल्पा भागवत, कार्यवाह अरुंधती सहस्रबुद्धे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मिताली इमानदार आदी मान्यवर उपस्थित होते.