Mon, June 5, 2023

तेजराज शहा यांचे निधन
तेजराज शहा यांचे निधन
Published on : 5 February 2023, 9:32 am
बोर्डी, ता. ५ (बातमीदार) : बोर्डी येथील प्रयोगशील बागायतदार व जैन समाजातील सक्रिय कार्यकर्ते तेजराज चुनीलाल उर्फ राजू (टीसी) शहा (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. ४) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तेजराज शहा यांनी येथील सुनाबाई पेस्तनजी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊन शेती व्यवसाय पत्करून भाजीपाला, फुलशेतीमध्ये यशस्वी प्रयोग केले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात चिकू बागायती विकसित केल्या होत्या. ग्रामीण भागात भात भरण्याची व्यवस्था नसल्यामुळे आदिवासी व शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी भात गिरणी सुरू केली होती.