पनवेलमध्ये ४१८ वाहनचालकांवर कारवाई

पनवेलमध्ये ४१८ वाहनचालकांवर कारवाई

पनवेल, ता. ५ (बातमीदार)ः वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने पनवेल वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. या अंतर्गत पनवेल शहरातील ४१८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने पनवेलमध्ये विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई सुरूच केल्याची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय नाले यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com