
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने संत रविदास महाराज जयंती साजरी
भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या वतीने नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महान संत रविदास यांनी भारतभर फिरून महान कार्य केले. ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान दिले. गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या त्यांच्या रचना आजही लोकप्रिय आहेत. याप्रसंगी प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशाप्रमाणे माहिती व जनसंपर्क अधिकारी सुनील झळके यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी
सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी फैसल तातली, बाळाराम जाधव, सोमनाथ सोष्टे, गिरीश घोष्टेकर, शेखर चौधरी, नितेश चौधरी व विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.