अंबाडीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाडीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम
अंबाडीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम

अंबाडीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ५ (बातमीदार) : द्रोणा फाऊंडेशन ट्रस्ट व राजमाता जिजाऊ कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंबाडीनाका येथे १८ व १९ फेब्रुवारी रोजी येथील राजमाता जिजाऊ धर्मदाय रुग्णालय परिसरात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य व रक्तदान शिबिरासह विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी लहान गट व मोठा गटासाठी प्रथम पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय तीन हजार व तृतीय क्रमांकासाठी दोन हजार व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत. यशस्वी वरिष्ठ नागरिक व युवकांचा सत्कार सोहळा, शिव जयंती उत्सव, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम होणार आहेत.