मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील चौघांना बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील चौघांना बेड्या
मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील चौघांना बेड्या

मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील चौघांना बेड्या

sakal_logo
By

नालासोपारा, ता. ६ (बातमीदार) : वसई, विरार, नालासोपारा परिसरात पार्किंग केलेल्या मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आचोळा गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. तुलिंजमध्ये या टोळीतील चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी तीन गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली.

सलाउद्दीन सलीम खान (वय २२), बिपिन दिलीप राय (वय २७), झिशान अहमद ईबरार खान (वय २७), अविनाश नानाकचंद वाल्मीकी (वय ३०) अशी अटक आरोपींची नावे असून, ते नालासोपाराच्या विविध भागांतील राहणारे आहेत. आचोळा पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना नालासोपारा पूर्व अलकापुरी भागात दोन इसम बेवारस व जुन्या मोटरसायकली चोरी करत असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुधीर गवळी, सहायक पोलिस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी यांच्या पथकाने झालावाड मैदानाजवळील अलकापुरी रिक्षा स्टॅण्ड परिसरात सापळा रचला असता, दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आचोळा पोलिस ठाणे हद्दीतील तीन गुन्ह्यांची कबुली दिली.