सण, उत्सव प्रकल्प प्रदर्शनाला प्रतिसाद

सण, उत्सव प्रकल्प प्रदर्शनाला प्रतिसाद

कल्याण, ता. ६ : कल्याण येथील शारदा मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सण व उत्सव प्रकल्प प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध सण व उत्सवाचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘कृतीतून शिक्षण’ या संकल्पनेतून प्रकल्प तयार करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्‍घाटन शारदा मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष बोरसे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन सर, ज्येष्ठ शिक्षिका अपर्णा हर्षे, शिक्षिका काजल बेदरकर, वंदना रणाळकर, शीतल दलाल उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com